महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुपरस्टार पवन कल्याणची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - पवन कल्याणवर होम क्वारंटाईन

सुपरस्टार पवन कल्याणची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. डॉ. टी सुमन या खम्मम येथून पवन कल्याणवर उपचार करण्यासाठी हैदराबादला दाखल झाल्या आहेत.

ACTOR PAWAN KALYAN
सुपरस्टार पवन कल्याण

By

Published : Apr 16, 2021, 6:12 PM IST

हैदराबाद- दाक्षिणात्य पॉवरस्टार आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांना कोरोनाची लागण झाली आहे. हैदराबादजवळील फार्म हाऊसवर ते उपचार घेत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला ३ एप्रिल रोजी पवन कल्याण यांनी तिरुपती येथे सभेत भाग घेतला होता. तिथून परत आल्यानंतर त्यांना बरे वाटत नव्हते. त्यांनी कोरोनाची टेस्ट घेतली होती. यात काही लक्षणे दिसून आली नव्हती. त्यांना थोडा थकवा आणि ताप जाणवत असल्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरू केले होते. अखेर आज त्यांची पुन्हा केलेली कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

पवन कल्याण यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांचे मोठे बंधू चिरंजीवी आणि पुतण्या रामचरण यांनी केली आहे. निर्माता नागा वामशी हे पवन कल्याणसोबत राहात असून त्यांची काळजी घेत आहेत. डॉ. टी सुमन या खम्मम येथून पवन कल्याणवर उपचार करण्यासाठी हैदराबादला दाखल झाल्या आहेत.

कामाचा विचार करता पवन कल्याण यांचा वकिल साब हा चित्रपट गेल्या आठवड्यात ९ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. पिंक या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे हे तेलुगु रुपांतरण होते. यात मूळ पिंक चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेली वकिलाची भूमिका पवन कल्याणने साकारली आहे. याला जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.

हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला अत्यावश्यक सेवा म्हणून मानले जावे; IFTPC ची मागणी!

ABOUT THE AUTHOR

...view details