मुंबई- गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच सिनेमाने १०० कोटींचा गल्ला पार केला होता. यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
प्रदर्शनानंतर तिसऱ्या आठवड्यात 'सुपर ३०'च्या कमाईत पुन्हा वाढ - राजस्थान
तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहता हा सिनेमा लवकरच १५० कोटींचाही गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.
शुक्रवारपर्यंत चित्रपटाच्या कमाईचे आकडे २ कोटीच्या घरात होते. मात्र, शनिवारी सिनेमाने ४.४७ कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहता हा सिनेमा लवकरच १५० कोटींचाही गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.
दरम्यान सिनेमानं आतापर्यंत १२०.३२ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.