महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'या' दिवशी 'सुपर ३०'चा ट्रेलर होणार प्रदर्शित, पाहा नवं पोस्टर - anand kumar

१२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

'सुपर ३०'चं नवं पोस्टर

By

Published : Jun 3, 2019, 4:57 PM IST

मुंबई- हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट अनेक अडथळ्यांनंतर जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या रिलीज डे विषयी घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

येत्या ४ जुनला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.

सिनेमाचं एक नवं पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्रेलर प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. मीटू प्रकरणी विकास यांच्यावर आरोप झाल्यानंतर चित्रपटाच्या क्रेडीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. मात्र, आता याप्रकरणी विकास बहलला क्लीन चीट मिळाली असून पुन्हा एकदा त्यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय देण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details