महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सुपर ३०' आता जम्मू-काश्मीरमध्येही करमुक्त, आतापर्यंत जमवला इतका गल्ला

याआधी हा सिनेमा बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. .यानंतर आता जम्मू काश्मीरमध्येही तो करमुक्त झाला.

'सुपर ३०' आता जम्मू-काश्मीरमध्येही करमुक्त

By

Published : Aug 2, 2019, 9:12 AM IST

मुंबई- गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट काही आठवड्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विद्यार्थ्यांसाठी जिद्द आणि आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण असलेला हा चित्रपट आतापर्यंत अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आला. यात आता जम्मू-जम्मू-काश्मीरचाही समावेश झाला आहे.

याआधी हा सिनेमा बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर आता जम्मू काश्मीरमध्येही तो करमुक्त झाला. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

विकास बहलचं दिग्दर्शन असलेला 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित झाला होता. सिनेमातून आनंद कुमारांचा पापड विकण्यापासून ते गरिब आणि अभ्यासू मुलांची ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपड करण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १३० कोटींचा गल्ला जमावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details