महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिल्लीच्या सरकारी शाळेत शिकवणार 'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमार - Delhi govt schools

इथून पुढे आनंद कुमार महिन्यातून एकदा दिल्लीतील सरकारी शाळेत शिकवण्यासाठी येणार असून ते ११ आणि १२वीच्या विद्यार्थांना ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहेत. अशी माहिती देत सिसोदिया यांनी 'सुपर ३०' चित्रपट दिल्लीत करमुक्त केल्याची घोषणाही केली.

'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमार

By

Published : Jul 24, 2019, 11:33 PM IST

मुंबई- गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमामुळे आनंद कुमार यांचे कार्य प्रकाशझोतात आले. आता हेच आनंद कुमार दिल्लीच्या सरकारी शाळेतही शिकवणार आहेत.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आनंद कुमारांनी आज माझ्यासोबत दिल्लीच्या सरकारी शाळेत भेट दिली. त्यांचं काम आणि व्यक्तिमत्व देशातील प्रत्येक शिक्षकांना प्रेरणा देणारं आहे. त्यांच्यामुळेच सामान्य घरातील मुलं जेइइ आणि आयआयटीमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकली. यालाच म्हणतात खरा गुरू, असं सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इथून पुढे आनंद कुमार महिन्यातून एकदा दिल्लीतील सरकारी शाळेत शिकवण्यासाठी येणार असून ते ११ आणि १२वीच्या विद्यार्थांना ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहेत. अशी माहिती देत सिसोदिया यांनी 'सुपर ३०' चित्रपट दिल्लीत करमुक्त केल्याची घोषणाही केली.

ABOUT THE AUTHOR

...view details