मुंबई - गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर शतक करत १००. ५८ कोटींची कमाई केली आहे.
'सुपर ३०'चं शतक; जाणून घ्या, कोणत्या राज्यात केली किती कमाई - IIT
सामान्य विद्यार्थ्यांची असामान्य स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या आनंद कुमारांची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या सिनेमाला मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.
सामान्य विद्यार्थ्यांची असामान्य स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या आनंद कुमारांची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या सिनेमाला मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटानं मुंबईत ३१.४९, दिल्लीत २०.६६, पंजाबमध्ये ८.७७, राजस्थानात ४.६३, बिहारमध्ये ३.५९ तर बंगालमध्ये ५.८५ कोटींची कमाई केली आहे.
प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७५.८५ कोटींचा गल्ला जमावला तर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने २४.७३ कोटींची कमाई केली. विद्यार्थ्यांसाठी जिद्द आणि आत्मविश्वासाचं उदाहरण असणारा हा चित्रपट राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे.