मुंबई- गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. सिनेमात हृतिक रोशनने आनंद कुमारांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपटाची सात दिवसांची कमाई समोर आली आहे.
'सुपर ३०'ची जादू कायम, सात दिवसात केली इतकी कमाई - anand kumar
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपटाची सात दिवसांची कमाई समोर आली आहे. या चित्रपटाला मुंबईतील प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
हृतिकच्या 'सुपर ३०' ने बॉक्स ऑफिसवर सात दिवसात ७५.८५ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या चित्रपटाला मुंबईतील प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
हृतिकचा हा सिनेमा बिहार आणि राजस्थानमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशातही या चित्रपटाला करमुक्त केलं जावं, अशी मागणी करत 'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमार यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर शतक गाठणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.