मुंबई- अभिनेत्री सनी लिओनी काही दिवसांपूर्वीच पती डॅनियल वेबर, मुलगी निशा, आशेर आणि नोह यांच्यासोबत लॉस एंजेलिसला गेली आहे. मात्र, आता सनीची भारतात परतण्याची इच्छा आहे. तिला आपले मुंबईतील घर सोडायचे नसून लवकरच भारतात परतायचे आहे, असे तिने म्हटले आहे.
सनी म्हणाली, सध्या मुंबईतील घरी नसल्याचे मला दुःख आहे. मला खरेच मुंबई सोडण्याची इच्छा नव्हती. याच कारणामुळे आम्हाला इकडे येण्यासाठी एवढा कालावधी लागला. मात्र, या कठीण परिस्थितीत डॅनियलच्या आई-वडिलांसोबत राहाणे गरजेचे होते. इतरांप्रमाणेच त्यांनादेखील त्यांच्या प्रिय व्यक्तींसोबत राहायचे होते.