नवी दिल्ली - बॉलिवूड जगतात आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओन बर्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. यावेळी पण सनी एका अतिशय विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. कोलकाता येथील महाविद्यालयात बीए प्रवेशासाठी जाहीर केलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये सनी लिओनचे नाव सर्वात टॉपमध्ये आढळले. गुणवत्ता यादीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बीए इंग्लिश ऑनर्स कोर्सच्या प्रवेशासाठी कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यानंतर सनीने आपली मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि तिने आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. सनीने ट्विट करून लिहिले की, मी तुम्हाला पुढच्या सत्रात कॉलेजमध्ये भेटते. मला आशा आहे की तुम्ही माझ्या वर्गात असाल.