महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सनी लिओनीचे 'परदेशी' गाणे रिलीज होताच झाले हिट - सनी लिओनीचे नवे गाणे 'परदेशी' रिलीज

यूट्यूबवर 'परदेशी' या गाण्याने लोकप्रियता मिळवली आहे. सनी लिओनीचा नवा ट्रॅक 'परदेसी' रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच 10 लाखाहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. सनीच्या या गाण्याने प्रेक्षकांचे ह्रदय जिंकले आहे.

सनी लिओनीचे 'परदेशी' गाणे
सनी लिओनीचे 'परदेशी' गाणे

By

Published : Oct 14, 2021, 7:26 PM IST

मुंबई- बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनीचे 'परदेसी' हे नवीन गाणे 14 ऑक्टोबर रोजी रिलीज झाले आहे. 'परदेसी' गाण्यात सनी लिओनी सुंदर दिसत आहे. सनीने पुन्हा एकदा तिच्या अप्रतिम सौंदर्य आणि मनमोहक अदाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सनी लिओनीचे 'परदेसी' हे गाणे हिट झाले आहे, कारण लोक ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

यूट्यूबवर 'परदेशी' या गाण्याने लोकप्रियता मिळवली आहे. सनी लिओनीचा नवा ट्रॅक 'परदेसी' रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच 10 लाखाहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. सनीच्या या गाण्याने प्रेक्षकांचे ह्रदय जिंकले आहे.

'परदेशी' गाण्याचे गीत संगीत

सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेले 'परदेशी' हे गाणे फीट असीस कौरने गायले आहे. गाण्याचे लिखान केलेल्या अर्कोने त्याला संगीतही दिले आहे. आता हे गाणे पाहून चाहते सनीच्या सौंदर्याची आणि गाण्याची स्तुती करत आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सनी लिओनीच्या 'परदेसी' या गाण्यावर एक चाहता लिहितो, 'सनी लिओनीचा डान्स अतिशय अप्रतिम आहे आणि तिने डान्स फ्लोअरवर धमाका निर्माण केला आहे.' त्याचबरोबर एकाने लिहिले आहे, 'सनीची क्यूटनेसने तिच्या वयावरही मात केली आहे.'

एका चाहत्याने लिहिले, 'सनी नेहमी आमचे हृदय चोरते. खूप गोड परदेसी. ' अशाप्रकारे तिचे चाहते या गाण्यावर फिदा झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्ननने सचिन तेंडूलकरची मुलगी साराच्या फोटोवर दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details