मुंबई- चित्रपटांपेक्षाही जास्त आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच सनी लिओनीचा आज ३८ वा वाढदिवस. बिग बॉस ५ च्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या सनीसाठी हा शो अधिक खास ठरला कारण यानंतरच तिला महेश भट्ट यांनी आपल्या चित्रपटात रोल दिला.
B'dya Spl: अॅडल्ड इंडस्ट्रीत येण्याआधी सनी करायची बेकरीत काम, बनायचं होतं नर्स - birthday special
अभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस. सनीच्या अॅडल्ट स्टारपासून बॉलिवूडपर्यंतच्या प्रवासात अनेक वळणं आली. तिने १९ वर्षांची असताना अॅडल्ट फिल्ममध्ये काम करण्यास सुरूवात केली

सनी लिओनीचा अॅडल्ट स्टारपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास रंजक आहे. सनी लिओनीचं खरं नाव करणजीत कौर आहे आणि ती पंजाबची आहे. तिने आतापर्यंत ५० हून अधिक अॅडल्ट चित्रपटांत काम केलं आहे. विशेष म्हणजे अॅडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी सनी जर्म बेकरी 'जिफी लूब'मध्ये काम करायची.
सनीला नर्स बनायचं होतं, यासाठी तिने मेडिकल सायन्सचा अभ्यास केला होता. मात्र तिने १९ वर्षांची असताना अॅडल्ट फिल्ममध्ये काम करण्यास सुरूवात केली. मात्र, अॅडल्ट इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याआधी आपण केवळ महिलांसोबत अॅडल्ट फिल्म करणार असल्याचं सनीने स्पष्ट केलं होतं.