मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि नवीन खासदार सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्रचा नातू करण देओल आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. लवकरच तो 'पल पल दिल के पास' या चित्रपटात झळकेल. सनी देओलने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९ जुलैला झळकणार होता. मात्र राजकीय जबाबदाऱ्या वाढल्यामुळे सनीने हे रिलीज पुढे ढकलले आहे. आता हा चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होईल.
धर्मेंद्रचा नातू बॉलिवूडसाठी सज्ज, सनी देओलमुळे लांबतोय डेब्यू - Dharmendra
सनी देओलचा मुलगा करण लवकरच 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार होता. मात्र सनीच्या राजकीय कामामुळे हे रिलीज पुढे ढकलण्यात आलंय.

'पल पल दिल के पास
या चित्रपटात करण देओलसोबत सहर बाम्बा झळकणार आहे. झी स्टुडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट बनला आहे. याच्या रिलीजची तारीखदेखील झी स्टुडिओने इन्स्टाग्रामवरुन जाहिर केली आहे.
करणचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होत असल्यामुळे सनी देओल खूश आहे. आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले होते. 'पल पल दिल के पास' या चित्रपटाची प्रतीक्षा आता २० डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे.