महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सनी देओलने उलगडले रहस्य, प्रत्येक निर्मात्यांनी नाकारला होता 'घायल'

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 'घायल' चित्रपटाची कथा सनी देओलला ऐकवली. मात्र यावर सिनेमा बनवण्यासाठी एकही निर्माता पुढे आला नाही. अखेर धर्मेंद्र यांनी याची निर्मिती केली. १९९० या वर्षाचा सर्वाधिक सिनेमाचा मान या सिनेमाला मिळाला आणि सनी देओल हा अभिनेता उदयास आला.

By

Published : Jun 26, 2020, 4:23 PM IST

Sunny Deol talk about his first film Ghayal
प्रत्येक निर्मात्यांनी नाकारला होता 'घायल'

मुंबई -नव्वदच्या दशकात नवोदित दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 'घायल' चित्रपटासाठी अनेक निर्मात्यांचे उंबरे झिजवले होते. मात्र सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकही निर्माता पुढे आला नाही. अखेर धर्मेंद्र यांनी स्वतः या चित्रपटाची निर्मिती केली होती.

२२ जून १९९० ला रिलीज झालेला 'घायल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. इतकेच नाही तर सनी देओलला पंकज कपूर आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री जयाभारती यांच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार (स्पेशल जूरी अवार्ड) संयुक्तपणे देण्यात आला होता. सनीने आपल्या 'घायल' चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांसाठी शेअर केल्या आहेत.

सनी देओल म्हणाला, ''राज दिग्दर्शक म्हणून करियर सुरुवात करणार होते. त्यांनी मला कथा ऐकवली, मला खूप आवडली आणि मी यासाठी तयार झालो. उघडपणे आहे की राज एक दिग्दर्शक होते, त्यामुळे निर्माता शोधणे एक दिव्य होते. आम्ही अनेक निर्मात्यांच्या जवळ गेलो. सर्वांनी सांगितले हा सिनेमा बनवू नका, चालणार नाही. शेवटी मी वडिलांच्याकडे गेलो.''

सनीने पुढे सांगितले, ''माझ्या वडिलांना कथा आवडली आणि त्यांनी सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. पापाने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही भरपूर मेहनत केली.''

सिनेमाच्या स्क्रिनिंगचा दिवस आठवताना सनी म्हणाला, ''स्क्रिनिंगच्यावेळी मी आणि राज खूप घाबरलो होतो. जेव्हा स्क्रिनिंगनंतर लोक बाहेर पडले तेव्हा मी राजला म्हणालो, ठिक आहे, आता चित्रपट बनलाय, काहीच करु शकत नाही. फेल झालो तर असा सिनमा बनवायचा नाही. खरेतर हा चित्रपट खूप हिट झाला आणि त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.''

'घायल' चित्रपटात सनीसोबत मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर, मौसमी चटर्जी और अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी अनेक सिनेमातून काम केले. यात 'दामिनी' आणि 'घातक' या सिनेमांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details