महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सनी देओलने केली 'गदर -2'ची घोषणा, दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार पोस्टर - दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार पोस्टर

सनी देओलने 'गदर -2' चित्रपटाची घोषणा केली आहे आणि चित्रपटाचे पोस्टर 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

सनी देओलने केली 'गदर -2'ची घोषणा
सनी देओलने केली 'गदर -2'ची घोषणा

By

Published : Oct 14, 2021, 5:36 PM IST

मुंबई- 'गदर' या गाजलेल्या सिनेमातील डायलॉग अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणातून गेलेले नाहीत. सनी देओलचा तो रांगडा अवतार आणि त्याच्या तोंडी असलेले ते बुलंद संवाद आठवले तर अजूनही प्रेक्षकांच्या अंगार शहारे येतात. हाच अनुभव पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सनी देओलने 'गदर -2' चित्रपटाची घोषणा केली आहे आणि चित्रपटाचे पोस्टर 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

तारा सिंह अर्थात 'गदर' चित्रपटाच्या सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे. सनी देओलने चाहत्यांना ही आनंदाची बातमी देणारा फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'द कथा कंटिन्यूज' असे 2 या आकड्यासह लिहिलेले आहे, परंतु चित्रपटाच्या नावाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सनीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'उद्या सकाळी 11 वाजता खूप खास आणि माझ्या हृदयाच्या जवळच्या गोष्टीची घोषणा करणार आहे. उद्या ही जागा बघा '.

विशेष म्हणजे, सनी देओल लवकरच आर बाल्कीच्या 'चुप' या थ्रिलर चित्रपटाचाही एक भाग असेल. सनी देओल सोबत, पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरी देखील चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी सनी आणि पूजाची जोडी बॉडीगार्ड (1995) चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर पूजा आणि सनी 'बॉर्डर' चित्रपटातही एकत्र दिसले होते.

अभिनेता आणि राजकारणी असलेल्या सनी देओल अखेरीस 'ब्लँक' (2018) या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर 2019 मध्ये, सनी देओलने त्याचा मोठा मुलगा करण देओलला 'पल-पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. हा चित्रपट स्वतः सनी देओलने दिग्दर्शित केला होता.

हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details