मुंबई- अभिनेता मिलान लूथरियाचा आगामी 'तडप' हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. यात त्याची जोडी अभिनेत्री तारा सुतारियासोबत आहे. रिलीजची तारीख आणि इतर तपशिलांबरोबरच चित्रपटाचे एक पोस्टरही प्रसिध्द करण्यात आले आहे.
नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली बनणारा 'तडप' हा चित्रपट तेलुगू हिट फिल्म 'आरएक्स १००' चा रिमेक आहे. मूळ चित्रपटात कार्तिकेय गुम्माकोंडा आणि पायल राजपूत यांच्या प्रमुख भूमिकेत होते.