मुंबई - कहानी 2' चित्रपट अभिनेता अंगद बेदीला त्रासदायक ठरु शकतो, असे दिग्दर्शक सुजॉय घोष यांना वाटते.
घोष यांनी इंटरनेट युजर्ससाठी ट्विटरवर कहानी 2 पाहण्यासंबंधी एक ट्विट केले आहे. यात लिहिले आहे, मला वाटते झी आज कहानी 2 दाखवणार आहे. अशात जर इच्छा झाली तर पाहा.
यावर अंगद बेदीने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे, इच्छा झालीय दादा.
अंगदला प्रतिक्रिया देताना सूजयने म्हटले आहे, बघ, पण तू नवीन बाप आहेस. कदाचित तुला याचा त्रास होऊ शकतो.
कहानी 2: दुर्गा रानी सिंह' चित्रपटाला एका सस्पेन्स ड्रामाच्या स्वरुपात सादर केले आहे. मुख्य भूमिकेत विद्या बालन आणि अर्जुन रामपाल आहेत.