मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत गेल्या १४ जून रोजी वांद्रे येथील घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली ६-७ महिने तो डिप्रेशनच्या त्रासाने त्रस्त झाला होता. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
बॉलिवूड निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलाय. या चित्रपटाचे शीर्षक असेल 'सुसाइड ऑर मर्डर?' या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्यांनी रिलीज केले आहे.
हेही वाचा सुशांतचा मृतावस्थेतील फोटो होत होता व्हायरल, साजिदने गृहमंत्र्यांशी बोलून थांबवला प्रसार
शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सुशांतची ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे. अॅनिमेशनच्या आधारे त्याच्या आतमध्ये सुरू असलेल्या हालचाली दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पोस्टरवर शीर्षकासोबत टॅगलाईन आहे, 'ए स्टार वाज लॉस्ट.' निर्मात्याने याबद्दल पुढे लिहिलंय, ''मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे स्टार आणि प्रॉडक्शन हाऊसची जी मोनापॉली आहे ती संपुष्ठात आणण्यासाठी मी हा चित्रपट बनवित आहे.''