मुंबई - शाहरुख खानची लाडकी लेक सुहान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सतत नवनवे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करीत असते. अद्याप बॉलिवूडपासून दूर असलेली ही स्टार किड एखाद्या प्रख्यात अभिनेत्री इतकीच लोकप्रिय आहे. तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केलेला व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपण २० वर्षांची झाल्याचे सांगत आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तिच्या वाढदिवसाचे सेलेब्रिशन होऊ शकत नाही. परंतु या छोट्याशा व्हिडिओतून तिला फॅन्स आणि फॉलोअर्सचे भरपूर प्रेम मिळत आहे.