मुंबई- शाहरुख खानचे कुटुंब गेल्या वर्षाच्या अखेरीस अतिशय कठीण प्रसंगातून गेले. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबावर कठीण प्रसंग दुदरला होता. त्यावेळी किंग खानला कुटुंबासाठी एक दिवस काढणे कठीण झाले होते. 'मन्नत'मध्ये पुन्हा एकदा आनंद परतला आहे. शाहरुखसह त्याचे संपूर्ण कुटुंब आता सोशल मीडियावर सक्रिय झाले असून शाहरुखनेही आपले काम सुरू केले आहे.
आता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता या भागामध्ये सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि अबराम खान यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सर्वजण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.
पूलमध्ये सुहाना, अनन्या आणि शनाया यांच्या बोल्ड स्टाइलने चाहत्यांना वेड लागत आहे. महिला दिनानिमित्त हा व्हिडिओ शनाया कपूरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे तीन स्टार किड्स बिकिनी घालून पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. त्याचवेळी चाहते या तिन्ही सेलिब्रिटींचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा -शाहरुखच्या सुंदर लूकने वाढवली पठाणबद्दलची उत्सुकता पाहा फोटो