महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'...म्हणून अदितीनं सूफीयम सुजातयम'मधील भूमिकेला दिला होकार'

'सूफ़ीयम सुजातयम' या चित्रपटात प्रेक्षकांना एका रम्य संगीतमय प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता जयसूर्या आणि अदिती राव हैदरी हे पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट 3 जुलैला ओटीटी प्लेटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Aditi Rao Haidary
अदिती राव हैदरी

By

Published : Jul 2, 2020, 3:53 PM IST

मुंबई -अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या आगामी म्युझिकल रोमांटिक ड्रामा फिल्म 'सूफीयम सुजातयम'च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढू लागली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका रम्य संगीतमय प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता जयसूर्या आणि अदिती राव हैदरी हे पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'सूफीयम सुजातयम' चित्रपटातील या व्यक्तिरेखेला होकार देताना मनात आलेल्या भावना अभिनेत्री अदिती राव हैदरीने व्यक्त केल्या. ती म्हणाली की “जेव्हा मी हे कथानक ऐकले, तेव्हा मला ते खूप आवडले. मी साकारणार असलेल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या भावनात्मकतेला न्याय देण्याविषयी जर मी साशंक असेन तर मी ती भूमिका स्वीकारते. कथानकातील निरागसता आणि पवित्रतेने मला तिच्याकडे आकर्षित केले होते."

हेही वाचा - सुशांतच्या 'दिल बेचारा'ची नायिका संजनाचे बॉलिवूड सोडण्याचे संकेत?

चित्रपटातील दोन अतीव सुंदर गाण्यांची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या गाण्यांनी एव्हाना प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ‘वाथिक्कलु वेल्लारिप्रवु’ आणि ‘अल्हम्दुलिल्लाह’ नामक दोन्ही गाण्यांनी श्रोत्यांना पूर्णपणे मंत्रमुग्ध केले असून चित्रपटाविषयी त्यांची उत्सुकता वाढवली आहे. नारानीपुझा शनावास द्वारे लिखित व दिग्दर्शित, सूफीयम सुजातयम ची निर्मिती विजय बाबू यांनी आपल्या ‘फ्राइडे फिल्म हाउस’ या बॅनर अंतर्गत केली आहे. चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर अनु मोठेदथ असून दीपू जोसेफ यांनी एडिट केले आहे. 'सूफीयम सुजातयम'ला कार्यकारी निर्माता विनय बाबू यांच्याद्वारे एकत्र आणण्यात आले असून 3 जुलैला ओटीटी प्लेटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details