महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील : सुभाष घई

प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनाने निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांना धक्का बसला आहे. सरोज यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. त्या क्षणांचा फोटो शेअर करीत अश्रूपूर्ण डोळ्यांनी सुभाष घई यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

saroj khan will live in history of choreography for indian cinema
कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील

By

Published : Jul 3, 2020, 10:15 PM IST

मुंबई - दिग्दर्शक सुभाष घई यांनी सरोज खान यांच्या निधनाने व्यक्तीगत नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलंय की कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये त्या कायम जिवंत राहतील.

कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील

सुभाष घई यांच्या जवळपास सर्व चित्रपटातील गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठी सरोज खान यांनी मदत केली होती. यामध्ये 'हीरो' (1983), 'कर्मा' (1986), 'राम लखन' (1989),'खलनायक' (1993),'परदेस' (1997), 'ताल' (1999), 'यादें' (2001) और 'किस्ना' (2005) या चित्रपटांचा समावेश आहे.

कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील

सुभाष घई यांनी एक भावनात्मक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय, , "सरोज खान. माझी सर्वात मोठी वैयक्तिक हानी. सिनेमामधील माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग - सरोज जी. हिंदी सिनेमात शास्त्रीय नृत्य जिवंत ठेवणे सरोज खानचे काम होते. बदल आला आहे आणि बदलेल, पण आता सरोज खान येणार नाही. आम्ही सर्व त्याचे विद्यार्थी बनून मास्टर झालो आहोत. सिनेमा त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल. मी काय बोलू शकतो, माझ्याकडे शब्द नाहीत. मी दु: खी आहे."

कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील

व्हिडिओसोबत त्यांनी एक संदेश शेअर केलाय, ''मीनाक्षी शेषाद्री, माधुरी दीक्षित, मनीषा कोइराला आणि ऐश्वर्या राय सारख्या तारकांना सावरण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.''

कोरिओग्राफीच्या इतिहासामध्ये सरोज खान कायम जीवंत राहतील

ABOUT THE AUTHOR

...view details