मुंबई - आरे बचाव आंदोलकांनी काल अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र त्यांच्या बंगल्याच्या बाहेर विद्यर्थ्यांनी आंदोलन करून संपूर्ण जलसा परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आंदोलकांना हुसकवण्याचा प्रयत्न केला; पण विद्यार्थी माघार घेत नव्हते. अखेर २२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मित्राला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ जावे लागले होते. तेव्हा त्यांनी कारने प्रवास करण्याचा निर्णय न घेता मेट्रोने प्रवास केला. मेट्रोच्या जलद प्रवासामुळे बिग बींचा मित्र प्रभावित झाला. मेट्रोचा प्रवास जलद, सोयीस्कर असल्याचं मत त्यांनी नोंदवलं. 'प्रदूषणावर उपाय म्हणून अधिक झाडे लावा'...मी माझ्या बागेत लावली; तुम्ही लावली का? अशा आशयाचे ट्विट बिग बी यांनी काल केले होते.