महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिन तेरा था, साल मेरा होगा! 'स्टूडंट ऑफ द ईअर २'चा ट्रेलर प्रदर्शित - tara sutariya

अपेक्षेप्रमाणेच टायगरच्या जबरदस्त अॅक्शनचा तडका यात दिसत आहे.

'स्टूडंट ऑफ द ईअर २'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Apr 12, 2019, 1:29 PM IST

मुंबई - बहुप्रतिक्षीत 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये 'स्टूडंट ऑफ द ईअर'च्या ट्रॉफीसाठी कलाकारांची चाललेली धडपड आणि प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. यासोबतच अपेक्षेप्रमाणेच टायगरच्या जबरदस्त अॅक्शनचा तडकाही यात दिसत आहे.

तारा सुतारिया आणि अनन्या पांडे याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्या तरी त्यांच्या अभिनयातून हे जराही जाणवत नाही. मात्र, अभिनेत्रींपेक्षाही चित्रपट टायगरला आणि स्टूडंट ऑफ द ईअर ट्रॉफीला फोकस करणारा असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये टायगरचा दिन तेरा था, साल मेरा होगा! हा डायलॉग वारंवार ऐकायला मिळत आहे.

२०१३ मध्ये आलेल्या 'स्टूडंट ऑफ द ईअर' चित्रपटाचाच हा सिक्वल असला तरीही नवीन कॅम्पस आणि नवीन दिग्दर्शक नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मे महिन्याच्या १० तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशात चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details