बहुप्रतीक्षित 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला - Shraddha Kapoor latest news
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा ट्रेलर शेअर केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. २५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
स्ट्रीट डान्सर थ्रीडी'
मुंबई - 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. सरस डान्स स्टंट्स, ताल धरायला लावणारे संगीत आणि वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचा जबरदस्त परफॉर्मन्स यात पाहायला मिळत आहे. 'एबीसीडी' चित्रपटाचाच हा तिसरा भाग आहे. रेमो डिसुजा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा ट्रेलर शेअर केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. २५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.