महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"बास करा रे, पोरगं आंधळं होईल" - सैफ अली - खोीाालो खोजददी

छोट्या तैमुर अलीच्या फोटोसाठी हौशी फोटोग्राफर्स उतावीळ असतात...पण सैफ अलीला त्यांचे वागणे पटत नाही. फ्लॅश टाकणाऱ्या फोटोग्राफर्सना तो म्हणाला, 'अरे थांबवा आता, नाही तर पोरगं आंधळं होईल.'

तैमुर आणि सैफ अली खान

By

Published : Apr 13, 2019, 1:39 PM IST

Updated : Apr 13, 2019, 3:24 PM IST


मुंबई - सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर केवळ २ वर्षांचा आहे. मात्र बॉलिवूडमधील कोणत्याही सेलेब्रिटी इतकाच तो ओळखला जातो. तो जिथेही दिसतो तिथे हौशी फोटोग्राफर्स त्याच्यावर कॅमेरा रोखत असतात. अलिकडेच तो मुंबई विमानतळावर सैफ अलीच्या खांद्यावर दिसला. मग काय उडाली ना धांदल फोटोग्राफर्सची.

सामान्यपणे लहान मुले अंगा खांद्यावर खेळत असतात तेव्हा त्यांचे लाड आणि कौतुक आई-वडील करतातच. सैफ सेलेब्रिटी असला तरी तोही एक सामान्य बापच आहे. मुलाला खांद्यावर घेऊन चाललेल्या सैफला जेव्हा फोटोग्राफर्स दिसले तेव्हा तो दचकला. फोटोग्राफर्सनी दणादण तैमुरचे फोटो घ्यायला सुरुवात केली आणि सैफ भडकला.

आपल्या मुलाच्या काळजीने त्याच्यातला बाप चिंतातूर झाला होता. सैफ म्हणाला, ''बस करो यार, बच्चा अंधा हो जायेगा.''

Last Updated : Apr 13, 2019, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details