मुंबई - संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातलाय. सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी अभिनेत्री करिना कपूरने आपला एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत लोकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित केले आहे. पाठीमागून क्लिक करण्यात आलेल्या या फोटोत करिना आरशासमोर उभी आहे. यात थोडा एक्स्ट्रा लाईटही टाकण्यात आलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मजबूत राहण्याचा सल्ला दिलाय.
'आम्ही करू शकतो आणि करून दाखवू' - करिना कपूर
करोना व्हायरसच्या संकटाच्या काळात करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. सर्वांनी मजबूत राहण्यासाठी प्रेरणा देत तिने म्हटलंय, ''आम्ही करू शकतो आणि आम्ही करून दाखवू.''
करिना कपूर
करिनाचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडलाय. लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लॉकडाऊनमुळे इन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत शूटींग थांबली आहेत. टीव्ही आणि फिल्म सेलेब्स सेल्फ क्वारंटाइनमध्या राहत आहेत.
आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयानुसार कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या आता ७२४वर पोहोचली आहे.