मुंबई :कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप (Kangana Ranaut Lock upp) या रिअॅलिटी शोला हैदराबाद शहर दिवाणी न्यायालयाने (Hyderabad Civil Court) स्थगिती दिली आहे. हा शो रविवारपासून प्रसारित होत आहे. त्यामुळे हा शो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियावर प्रसारित होणार नाही. शोच्या ट्रेलरच्या व्हिडिओ क्लिपची न्यायलयाने दखल घेतल्यानंतर, अंतरिम आदेश ( Stay order on Lock Upp ) जारी केला आहे.
याचिकाकर्ते आणि उद्योगपती सनोबर बेग यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यात कंगनाच्या शो 'लॉक अप'चे स्वरूप याचिकाकर्त्याच्या रजिस्टर आयडिया 'द जेल'च्या (The Jail) स्क्रिप्टशी जुळत असल्याचा दावा केला आहे. प्राइड मीडियाचे मालक सनोबेर बेग यांनी द जेल या शो ची संकल्पना शंतनु रे आणि शीरशाक आनंद यांनी लिहिली होती. आणि 7 मार्च 2018 रोजी कॉपीराईट कायद्यांतर्गत नोंदणी केली आहे. यात ही संकल्पना कशी विकसित झाली हे याचिकेत स्पष्ट केले आहे आणि विविध टप्प्यांवर त्यांनी गुंतवलेल्या पैशाच्या तपशीलांची यादी देखील दिली आहे.
लवकरच हा शो आणणार होतो