कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजाला विशेष महत्त्व असते. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्यातील सर्व मंडळांनी दुर्गापूजा मंडपात कोणालाही प्रवेश देऊ नये आणि मंडप हा प्रवेश निषिद्ध क्षेत्र म्हणून जाहीर करावा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. यातच अभिनेता चंदन रॉय सान्याल यांनी लोकांना यंदा दुर्गा मंडपात न जाता, घरूनच पूजा करावी, असे आवाहन केले आहे.
'पुढच्या वर्षीं दुर्गा पुजेला जायचे असले, तर यंदा घरातच बसा' - बंगाल दूर्गा पूजा न्यूज
अभिनेता चंदन रॉय सान्याल यांनी लोकांना यंदा दुर्गा मंडपात न जाता, घरूनच पूजा करावी, असे आवाहन केले आहे. चंदन रॉय सान्याल यांचा रावक्तो रोशियो हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दुर्गा मंडपात जाऊन गर्दी करण्यापेक्षा चित्रपटगृहात जाणे परवडणार आहे, असेही ते म्हणाले.
मी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करतो. कोरोना काळात लोकांनी घरी राहावे. घरातच राहून पूजा आणि प्रार्थना करावी. दुर्गापूजे दरम्यान, घरातच राहणे बंगालींसाठी कठीण आहे. मात्र, तुम्हाला पुढच्या वर्षीं दुर्गा पूजेला जायचे असले. तर यंदा घरातच बसा, असे चंदन रॉय सान्याल यांनी म्हटलं आहे.
चंदन रॉय सान्याल यांचा रावक्तो रोशियो हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दुर्गा मंडपात जाऊन गर्दी करण्यापेक्षा चित्रपटगृहात जाणे परवडणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून तुम्ही चित्रपट पाहू शकता. रावक्तो रोशियो लोकांना आवडेल, अशी मला आशा आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.