मुंबई- स्वप्नांचं शहर अशी ओळख आणि महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशाची शान असलेल्या मुंबईला भारताचं प्रवेशद्वार मानलं जातं. हजारो लोकांच्या स्वप्नपूर्तीत मोठा वाटा असलेल्या या मुंबईच्या नावातही मोठी कथा दडलेली आहे. या शहराचा बॉम्बेपासून मुंबई बनण्यापर्यंतचा प्रवास आता लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
बॉम्बेचा मुंबईपर्यंतचा प्रवास, 'मुंबई सागा'मध्ये झळकणार तगडी स्टारकास्ट - प्रतिक बब्बर
मुंबई सागा नावाच्या चित्रपटातून मुंबईच्या नामकरणाची धक्कादायक सत्य कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, समीर सोनी आणि अमोल गुप्ते अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
होय, मुंबई सागा नावाच्या चित्रपटातून मुंबईच्या नामकरणाची धक्कादायक सत्य कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, समीर सोनी आणि अमोल गुप्ते अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, क्रिशन कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीत अहिर हे करणार आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतचं फर्स्ट पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये १९ जूनला प्रदर्शित होणार आहे.