मुंबई -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग-लिंक्स समोर आल्या आहेत. यातच अभिनेत्री रकूलप्रित सिंगचेही नाव समोर आले आहे. त्यावर रकुलने दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून आज याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नवीन चावला यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे.
ड्रग-लिंक्समध्ये नाव आल्यावर रकुलने ठोठावला दिल्ली न्यायालयाचा दरवाजा - अभिनेत्री रकूलप्रित सिंग लेटेस्ट न्यूज
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग-लिंक्समध्ये अभिनेत्री रकूलप्रित सिंगचेही नाव समोर आले आहे. याप्रकरणी तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी 15 ऑक्टोबरला होणार असून त्यापूर्वी यावर निर्णय घेण्याचे सुचना न्यायालयाने अधिकाऱ्यांना केल्या आहेत. रिया चक्रवर्ती संबधित प्रकरणी वृत्त देताना, माध्यमे टीव्ही नियमांचे पालन करतील, असे न्यायालयाने म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीने आपले वक्तव्य मागे घेतले असल्याचा दावा रकूलप्रित सिंगने याचिकेत केला आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर प्रामुख्याने चित्रपटसृष्टीतील कलाकार अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात अमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.