मुंबई- दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी मैत्रीदिनानिमित्त ट्विटरवरून आपल्या खास मित्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. ईगा चित्रपटाचे निर्माते साई कोरीपथी यांच्यासोबतचा हा फोटो असून राजामौलींनी अतिशय सुंदर कॅप्शन देत आपल्या मैत्रीचं वर्णन केलं आहे.
मी त्याच्या आनंदाशिवाय काहीच मागणार नाही, राजामौलींनी मित्राला दिल्या शुभेच्छा - बजेट
एक अशी व्यक्ती जी मनानं अजूनही लहान मूल आहे. विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देणारी एक घट्ट मिठी चिन्ह आहे. तो माझा भीम आहे आणि मी इतर काही नाही पण त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करेल, असं राजामौलींनं म्हटलं आहे.
नियती तुमच्यासोबत असेल, तरच तुम्ही आयुष्यात साई गुरू यांच्यासारख्या व्यक्तीला भेटू शकता. एक अशी व्यक्ती जी मनानं अजूनही लहान मूल आहे. विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देणारी एक घट्ट मिठी चिन्ह आहे. तो माझा भीम आहे आणि मी इतर काही नाही पण त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करेल, असं राजामौलींनं म्हटलं आहे.
राजामौली हे सध्या आपल्या आरआरआर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटानंतर राजमौली या चित्रपटाच्या माध्यामातून आणखी एक बिग बजेट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत.