मुंबईः सान्या मल्होत्रा, विक्रांत मस्से आणि बॉबी देओल यांच्या भूमिका असलेला लव्ह होस्टल या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि दृश्यम फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
शाहरुखची रेड चिलीज आणि दृश्यम फिल्म्स बनवणार 'लव्ह हॉस्टेल' - 'लव्ह हॉस्टेल' हा एक क्राईम -थ्रिलर चित्रपट
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्सने 'लव्ह हॉस्टेल' चित्रपटाची घोषणा केली आहे. यात सान्या मल्होत्रा, विक्रांत मस्से आणि बॉबी देओल यांच्या भूमिका असतील. या वर्षीच्या सुरवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल आणि वर्ष अखेरीस हा सिनेमा रिलीज होईल.

'लव्ह हॉस्टेल' हा एक क्राईम -थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमॅटोग्राफर शंकर रमण यांनी केले असून यापूर्वी त्यांनी 'गुरगाव' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
या वर्षाच्या सुरुवातीस प्रसिद्ध झालेल्या 'कामयाब' नंतर रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि दृश्यम फिल्म्स यांचा हा दुसरा संयुक्त चित्रपट आहे. 'लव हॉस्टल'ची निर्मिती गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा करणार आहेत. या वर्षीच्या सुरवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल आणि वर्ष अखेरीस हा सिनेमा रिलीज होईल.