महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुखची मुलगी सुहाना किशोरवयीन रोमँटिक ड्रामामधून करणार पदार्पण? - सुहाना खानला झोया अख्तर करणार लॉन्च

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटाद्वारे लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शिका झोया अख्तर लवकरच सुहानाला आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक, 'आर्ची'च्या भारतीय रुपांतरणात लॉन्च करेल.

शाहरुखची मुलगी सुहाना
शाहरुखची मुलगी सुहाना

By

Published : Aug 20, 2021, 4:11 PM IST

Updated : Aug 20, 2021, 4:39 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अभिनेत्री होण्याची स्वप्नं पाहात असते. ती अजूनही न्यूयॉर्क विद्यापीठातून चित्रपट अभ्यास अभ्यासक्रम शिकत आहे. असे असले तरी ती बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या बातम्या वेबलॉईडमधून झळकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखची मुलगी लवकरच झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटाद्वारे लॉन्च होणार आहे. दिग्दर्शिका झोया अख्तर लवकरच सुहानाला आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक, 'आर्ची'च्या भारतीय रुपांतरणात लॉन्च करेल.

झोया अख्तर आर्ची या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकची भारतीय आवृत्ती ओटीटीसाठी बनवणार आहे. नेटफ्लिक्सवर याचे प्रसारण होईल. यात सुहाना मुख्य भूमिका साकारताना दिसेल. हा एक किशोरवयीन रोमँटिक ड्रामा असेल. सुहानाची निवड पक्की समजली जात असून इतर कलाकारांची निवड अद्याप सुरू आहे.

निर्मात्यांनी अद्याप सुहानाच्या कास्टिंगची आणि प्रकल्पाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही कारण ते अद्याप शाहरुखच्या सहमतीची वाट पाहत आहेत, त्यानंतर सुहाना करारावर सही करेल. सुहानासोबत दोन स्टार किड्सना लॉन्च करण्याचा विचार झोया करीत असल्याचेही समजते.

सुहानाचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट असला तरी यापूर्वी तिने 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' नावाच्या लघुपटात काम केले आहे. 2019 मध्ये यूट्यूबवर रिलीज झालेल्या या लघुपटाला 1.9 दशलक्ष व्यूव्ह्ज मिळाले होते.

हेही वाचा - शाहरुखची कॅरेबियन क्रिकेट टीम ‘ट्रिनबागो नाइट राइडर्स’ वरील लघुपट 'वी आर टीकेआर'!

Last Updated : Aug 20, 2021, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details