मुंबई - अभिनेता शाहरुख खान गेली काही वर्षे करियरच्या बॅडपॅचमधून जातो आहे. अलीकडच्या वर्षात रिलीज झालेले 'दिलवाले', 'जब हॅरी मेट सेजल', 'फॅन' आणि 'झिरो' हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चमकले नाहीत. आता त्याला पुन्हा एकदा सुपरहिट चित्रपटाची प्रतीक्षा आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा हुकमी यश मिळवणारा दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता शाहरुखसाठी सिनेमा बनवणार आहे.
शाहरुख फॅन्सनां खूशखबर, 'या' दिग्दर्शकासोबत करणार आगामी चित्रपट? - bollywood
शाहरुख खानला एका हिट चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अलिकडे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चाललेले नाहीत. या पार्श्वभूमीवर तो राजकुमार हिराणींसोबत आगामी चित्रपट करणार असल्याची चर्चा बॉलिवूड जगतात आहे.
शाहरुखच्या चित्रपटांचा विचार केला तर लव्ह स्टोरी चित्रपट हे त्याचा यशात भर टाकत आले आहेत. हिराणी त्याला घेऊन असाच रोमंटिक चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वीच शाहरुला हिराणींसोबत चित्रपट बनवण्याची इच्छा होती. मात्र ती गोष्ट जुळून आली नव्हती. या निमित्ताने ते एकत्र काम करतील आणि त्यांची केमेस्ट्री शाहरुखच्या यशाला पुन्हा झळाळी देईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
शाहरुखला ५ जून रोजी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड फॅन्स त्याच्या 'मन्नत' या बंगल्याच्या बाहेर जमले होते. यात एक विशेष व्यक्ती हजर होती. शाहरूखसोबत ईद साजरी करणारी ही व्यक्ती होती, सुप्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट डेविड लेटरमेन. लेटरमनसोबतही शाहरुख आगामी काळात काम करणार असल्याची सध्या चर्चा आहे. 'झिरो'ला मिळालेल्या अपयशानंतर तो ताकही फुंकून पीत आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे राजकुमार हिराणींसोबत तो आगामी चित्रपटात काम करणार असेल तर ती चाहत्यांसाठी पर्वणीच ठरु शकते.