महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

“२०२१ मध्ये तुम्ही मला मोठ्या स्क्रीनवर पहा”, शाहरुखचे चाहत्यांना आश्वासन - झीरो

शाहरुख खान गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यावर झळकलेला नाही. तो आगामी कोणत्या चित्रपटात झळकणार हे समजून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुखने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने चाहत्यांना आश्वासन दिले की यावर्षी तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.

शाहरुख खान

By

Published : Jan 2, 2021, 6:49 PM IST

मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी शनिवारी किंग खानने आपल्या चाहत्यांना आश्वासन दिले की यावर्षी तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.

शाहरुखने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तीन मिनीटाहून मोठा असलेल्या या व्हिडिओ पोस्टमध्ये त्याने थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

'झीरो' या चित्रपटानंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यापासून दूर गेला आहे. दोन वर्षापासून त्याचा एकही चित्रपट रिलीज झाला नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. आपल्या तमाम चाहत्यांना खूश करण्यासाठी त्याने हा व्हिडिओ शेअर केला.

यात शाहरुख म्हणतो, "मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उशीर केला आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण सहमत होईल की, २०२० सर्वांसाठी सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. या भयानक काळात आशा, सकारात्मकतेचा किरण शोधणे कठीण आहे. परंतु माझ्याकडे वाईट, कठीण दिवस, भयानक वर्षे पाहण्यासाठी एक मार्ग आहे.

“माझा विश्वास आहे की जेव्हा एखादा आयुष्याच्या सर्वात खालच्या ठिकाणी असेल, तेव्हा चांगली गोष्ट ही आहे की, इथून पुढे जाण्यासाठी एकच मार्ग आहे जो वरच्या, उंच आणि उत्तम ठिकाणी जाऊ शकतो,” असे शाहरुख खान म्हणाला.

“२०२१ मध्ये तुम्ही सर्व मोठ्या स्क्रीनवर पहा”, असा संदेश शाहरुखने व्हिडिओतून दिला आहे. मात्र अद्यापही त्याने शीर्षक सांगितलेले नाही.

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये "वॉर" चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली होती. यात शाहरुख खान भूमिका साकारत असल्याची चर्चा होती. 'पठाण' असे या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचे शीर्षक आहे. यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details