मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि संजय दत्त यांनी दोनदा एकत्र थोडेसे काम केले आहे. ते पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहरुख आगामी बहुभाषिक चित्रपटात संजय दत्तसोबत काम करीत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
2007 मध्ये संजय दत्त एसआरकेच्या ब्लॉकबस्टर 'ओम शांती ओम'च्या टायटल ट्रॅकमध्ये झळकला होता. त्यानंतर तो एसआरकेच्या 2012 मध्ये आलेल्या 'रा.वन'च्या ओपनिंग सीनमध्येही दिसला होता. अशा प्रकारे दोघांनी थोडेसे एकत्र काम केले आहे. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना नेहमी वाटत आले आहे की दोघे पुन्हा एकत्र येतील आणि मोठी भूमिका साकारतील.
संजय दत्त आणि शाहरुख खानच्या आगामी बहुभाषिक चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. परंतु या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 करणार आहे.