मुंबई - दिग्दर्शक करण जोहरला शाहरुख खान विरोधात केलेले ट्विट लाईक केल्यामुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सध्या करण जोहर विरोधात ट्विटरवर '#ShameOnKaranJohar' हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला आहे. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी या हॅशटॅग अंतर्गत करण जोहरवर निशाणा साधला होता. अशातच किंग खान यावर काय प्रतिक्रीया देतो याकडेही चाहत्यांचेही लक्ष लागले होते. आता शाहरुखने एक ट्विट करून करण जोहरची पाठराखण केली आहे.
'प्रेम करा वाद नको', 'किंग खान'ने केली करण जोहरची पाठराखण! - करण जोहर
करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे वर्षानुवर्षापासून खूप चांगले मित्र आहेत. आता शाहरुखने एक ट्विट करून करण जोहरची पाठराखण केली आहे.
करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे वर्षानुवर्षापासून खूप चांगले मित्र आहेत. शाहरुखने ट्विटरवर ट्विट करून लिहिले आहे, की 'मला सोशल मीडियावर कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. करण जोहरला तसं पण तंत्रज्ञानाची फार चांगली माहिती नाही. मात्र, त्याच्या दुसऱ्या बाजु खूप चांगल्या आहेत. जसे, की त्याच्या कपड्यांची निवड. आयुष्याप्रमाणे ट्विटरचे काही नियम नसतात. त्यामुळे वाद न पसरवता प्रेम करा'.
किंग खानच्या या ट्विटवर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत.
काय होते प्रकरण -
शाहरुख खानविरोधात अक्षय कुमारच्या एका चाहत्याने एक ट्विट केले होते. शाहरुख आणि अक्षय कुमारची तुलना होऊच शकत नाही, असे या ट्विटमध्ये लिहिले होते. हे ट्विट करण जोहरने लाईक केले होते. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी करण जोहरला धारेवर धरले.