मुंबई - सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांनी अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यांच्यासाठी कलाकारांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
शाहरुखने ट्विटरवर लिहिले आहे, ''बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या अम्फानमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आणि प्रेम. बातमीमुळे मी आतून हादरलोय. प्रत्येकजण माझ्या परिवारासारखा आहे. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येत नाही, तोपर्यंतया कठिण प्रसंगात आपण मजबूत राहिले पाहिजे.''