मुंबई -सध्या कोरोना विषाणूच्या कठीण परिस्थितीत कला विश्वातील कलाकार मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम फंडाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांनतर अनेक कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख देखील मदतीसाठी समोर आला आहे.
शाहरुख खानने पीएम आणि सीएम फंडला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण तसेच अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा केली आहे.
शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंटने सोशल मीडियावर ट्विट करत याची घोषणा केली आहे. आपल्या पोस्ट मध्ये शाहरुख खानने लिहिले आहे की, त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स पीएम केअर फंडला पैसे देईल. या फ्रँचायझीचे सह मालक जय मेहता आणि जूही चावलादेखील मदत करतील.