महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची रिलीज तारीख ठरली, पाहा व्हिडिओ - दीपिका पदुकोण

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक केली आहे. यशराज फिल्म्सने दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

'पठाण' चित्रपटाची रिलीज तारीख
'पठाण' चित्रपटाची रिलीज तारीख

By

Published : Mar 2, 2022, 1:43 PM IST

मुंबई- शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा आगामी चित्रपट पठाण 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यशराज फिल्म्सच्या अधिकृत हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, "थोडासा गोंगाट! पठाण आला आहे. तारखेची घोषणा करणारा व्हिडिओ आत्ताच पहा! 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात. हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होत आहे. #YRF50 फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर."

स्पाय थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो नंतर पठाण हा शाहरुख खानचा पहिला चित्रपट आहे.

हेही वाचा -टायगर श्रॉफचा 'बॅक जंप' स्टंट पाहून शिल्पा शेट्टीला बसला धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details