महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुखची मुलगी सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाचा मैत्रीणीने केला खुलासा - Suhan debut in Bollywood

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते याचा खुलासा अभिनेत्री अनन्या पांडेने केलाय. एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केलंय. सध्या सुहाना अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे.

फोटो, सुहाना खान इन्स्टाग्रामच्या सौजन्याने

By

Published : Jul 6, 2019, 6:02 PM IST


मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असल्यामुळे तिचे चाहतेही प्रचंड आहेत. बॉलिवूडपासून दूर असूनही ती लोकप्रिय आहे. सुहाना रुपेरी पडद्यावर कधी झळकणार याची चर्चा बऱ्याचवेळा रंगत असते. ती बॉलिवूडमध्ये अवतरणार असल्याचे सूतोवाच तिची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने केले आहे.

तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते. ती सध्या फिल्म स्कूलमध्ये जात असून पुढील शिक्षणासाठी ती न्यूयॉर्कला जाणार आहे. तिला आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर ती कधीही बॉलिवूड पदार्पण करेल, असे एका मुलाखतीत अनन्या पांडेने म्हटले आहे.

अनन्याच्या अगोदर शाहरुख खाननेही सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल भाष्य केले होते. तिचे शिक्षण पूर्ण व्हायला हवे असे तो म्हणाला होता. सध्या तरी सुहानाच्या पदार्पणासाठी काही काळ चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details