महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बाप्पाला निरोप दिल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख खान - शाहरुखने बाप्पाकडे मागितला आशीर्वाद

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने रविवारी गणपतीला निरोप दिला. शाहरुखने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर घरी असलेल्या गणेशाच्या मूर्तीचा फोटो शेअर केला. यावर लाखो चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात त्याच्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचाही समावेश आहे.

शाहरुखने दिला बाप्पाला निरोप
शाहरुखने दिला बाप्पाला निरोप

By

Published : Sep 20, 2021, 5:29 PM IST

Updated : Sep 20, 2021, 7:10 PM IST

मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानने रविवारी रात्री भगवान गणेशला निरोप दिला आणि पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची प्रार्थना केली. खानने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर घरी पूजा केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो शेअर केला. शाहरुखने लिहिले की, "पुढच्या वर्षी पुन्हा भेटू तोपर्यंत गणपतीचे आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत राहो ... गणपती बाप्पा मोरया !!! " फोटो शेअर केल्याच्या काही तासातच दहा लाखाहून अधिक चाहत्यांकडून प्रतिक्रिया मिळाल्या.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख

शाहरुख जरी भक्तीभावाने गणेश पूजन करीत असला तरी हे काही जणांना आवडत नाही. याबद्दल अनेकजण त्याच्यावर टीका दरवर्षी करीत असतात. याही खेपेला ही ट्रोलर्सची गँग त्याच्यावर निशाणा साधून आहे. तर काहीजणांनी त्याच्यावर होणाऱ्या या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. अनेकांनी शाहरुखचे मनोबल वाढावे यासाठी प्रतिक्रिया दिल्या आहे. खालील काही प्रतिक्रियांवर आपण नजर फिरवली तरी आपल्या हे ध्यानात येईल.

दरवर्षी श्रीगणेशाचे स्वागत करतो शाहरुख

2018 मध्ये, शाहरुखला त्याचा सर्वात लहान मुलगा अबराम खान याला गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी गणपतीची प्रार्थना केल्याबद्दल ट्रोल केले गेले होते. त्या वेळी, सुपरस्टारने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला होता ज्यात अबराम घरी गणपतीची प्रार्थना करताना दिसला होता. त्यावेळी फोटो शेअर करताना शाहरुखने लिहिले होते, "आमचा गणपती 'बाप्पा' घरी आहे, कारण छोटा त्याला कॉल करतो".

गणेश पूजेवरुन यापूर्वी शाहरुखवर झाली आहे टीका

अनेकांनी दुसऱ्या धर्माचा असूनही गणेश चतुर्थी साजरी केल्याबद्दल शाहरुख आणि त्याच्या लेकावर टीका केली होती. परंतु अशा टीकाला न कचरता शाहरुखने आपली ही परंपरा सुरू ठेवली आहे. तो दर वर्षी आपल्या घरी गणेश चतुर्थीला गणेशाची पूजा करतो.

शाहरुख खान आनंद एल रायच्या 'झिरो'मध्ये शेवटचा दिसला होता. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. सध्या तो 'पठाण' या चित्रपटाचे शुटिंग करीत आहे.

हेही वाचा -'टायगर 3'ची टीम ऑस्ट्रियात दाखल, कॅटरिनाने शेअर केला व्हिडिओ

Last Updated : Sep 20, 2021, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details