मुंबई - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा मेणाचा पुतळा सिंगापुरातील मॅडम तुसाद संग्राहालयात बुधवारी अनावरण करण्यात येणार आहे. ही माहिती बोनी कपूर यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
हुबेहुब श्रीदेवी... मेणाच्या पुतळ्याचे बुधवारी अनावरण, पाहा एक झलक - Madam Tussauds, Singapore
श्रीदेवीचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मॅडम तुसाद संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. बुधवारी याचे अनावरण होणार असल्याचे बोनी कपूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
![हुबेहुब श्रीदेवी... मेणाच्या पुतळ्याचे बुधवारी अनावरण, पाहा एक झलक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4325518-thumbnail-3x2-uu.jpg)
श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओत पुतळ्याच्या मेकींगची झलक पाहायला मिळत आहे. श्रीदेवीचे सौंदर्य या पुतळ्यात प्रतिबिंबीत झाल्याचे दिसते. बोनी यांनी ट्विटरमध्ये लिहिलंय, ''श्रीदेवी केवळ आमच्या नाही तर लाखो चाहत्यांच्या ह्रदयात विराजमान आहे. सिंगापूरमध्ये ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मॅडम तुसाद येथी पुतळ्याच्या अनावरणाची प्रतीक्षा आहे.''
१३ ऑगस्टला श्रीदेवीचा जन्मदिन असतो. त्यादिवशी मॅडम तुसाद संग्राहलयाच्या वतीने श्रीदेवींचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली. श्रीदेवी यांचे निधन २४ फेब्रुवारीला दुबईत झाले होते.