महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रीदेवी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या तिच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी - श्रीदेवी मृत्यू

श्रीदेवी यांची चौथी पुण्यतिथी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. श्रीदेवीचे अनेक किस्से असले तरी आम्ही तुम्हाला त्या 5 खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या कदाचित फक्त श्रीदेवीच्या काही चाहत्यांनाच माहित असतील.

श्रीदेवी
श्रीदेवी

By

Published : Feb 24, 2022, 7:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी यांची गुरुवारी (24 फेब्रुवारी) चौथी पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. ती दुबईत एका कौटुंबिक लग्नाला गेली होती आणि हॉटेलच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. श्रीदेवी आज आपल्यात नाही, पण तिचा नखरा, तिचे सौंदर्य, तिच्या आठवणी आणि तिचे चित्रपट आजही आपल्याला तिच्यापासून दूर जाऊ देत नाहीत. श्रीदेवीचे अनेक किस्से असले तरी आम्ही तुम्हाला त्या 5 खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या कदाचित फक्त श्रीदेवीच्या काही चाहत्यांनाच माहित असतील.

१) या कारणामुळे होती पतीवर नाराज

श्रीदेवी

श्रीदेवी प्रत्येक दिवस मुक्तपणे जगणारी खूप हसमुख व्यक्ती होती. पण तिला पती बोनी कपूरची एक गोष्ट अजिबात आवडली नाही. श्रीदेवीबद्दल असे म्हटले जाते की, बोनी कपूर जेव्हाही श्रीदेवीला तिच्या वयाची आठवण करून देत असत तेव्हा तिला खूप राग यायचा.

२) या गोष्टींशी तडजोड नाही

श्रीदेवी

श्रीदेवी सौंदर्याचे जिवंत उदाहरण होते, आजच्या अभिनेत्री देखील तिच्या 80 च्या दशकातील लुकशी स्पर्धा करू शकत नाही. खरे तर श्रीदेवी हेल्थ कॉन्शियस होती. तिने तिच्या लुकबाबत कधीच तडजोड केली नाही. तिने त्वचेची विशेष काळजी घेतली. यामुळेच श्रीदेवी तिच्या एअरपोर्ट लूकमध्येही छान दिसत होती. असे म्हटले जाते की, श्रीदेवीला कार्यक्रमाला जायला उशीर होत असे कारण ती तयार होण्यासाठी खूप वेळ काढत असे.

३) आवडता ड्रेस

श्रीदेवी

श्रीदेवीला बॉलिवूडमधील फॅशन दिवा देखील म्हटले जाते. तिची ड्रेसिंग स्टाइल वेगळी होती. श्रीदेवीच्या ड्रेसिंग कलेक्शनमध्ये साड्या जास्त होत्या. श्रीदेवी जेव्हाही देशाबाहेर जायची तेव्हा ती नक्कीच साडी घेऊन यायची. श्रीदेवी बहुतेक कार्यक्रमांमध्ये साडीत दिसायची.

४) स्वतः सांभाळल्या या जबाबदऱ्या

श्रीदेवी

श्रीदेवी ग्लॅमरस सोबतच घरेलू महिला देखील होती. हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त श्रीदेवीच त्यांच्या घराचे स्वयंपाकघर सांभाळत असे. खाण्यापिण्यापासून घरातील स्वच्छतेपर्यंतची जबाबदारी श्रीदेवी स्वत: सांभाळत होत्या.

५) मुलींवर खूप प्रेम होते

श्रीदेवी

बोनी कपूरसोबत लग्न केल्यानंतर श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली झाल्या. कोणत्याही कार्यक्रमात श्रीदेवी फक्त आपल्या मुलीसोबतच पोहोचायची. जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट 'धडक'च्या शूटिंग सेटवर श्रीदेवी नेहमी हजर असायची. पण दुर्दैवाने आपल्या मुलीचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट पाहण्या आधीच तिने या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा -शिबानी दांडेकरने शेअर केले मेहेंदी समारंभातील आनंदाचे क्षण

ABOUT THE AUTHOR

...view details