महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पोलंड'मधील चौकाला हरिवंशराय बच्चन यांचे नाव

अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांचे नाव पोलंडमधील एका चौकाला देण्यात आलंय. पोलंडच्या व्रोकला सिटी कौन्सिलने दिवंगत कवींना श्रद्धांजली हरिवंश राय बच्चन यांच्या नावाने चौकाचे नामकरण केले आहे.

Square named after Big B's father
चौकाला हरिवंशराय बच्चन यांचे नाव

By

Published : Oct 26, 2020, 1:14 PM IST

मुंबई - हिंदीमधील ख्यातनाम कवी आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांचे नाव पोलंडमधील एका चौकाला देण्यात आले आहे. पोलंडच्या व्रोकलाच्या सिटी कौन्सिलने दिवंगत कवींना श्रद्धांजली वाहण्यासाठी, हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने चौकाचे नामकरण केले आहे. अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली.

"पोलंडच्या सिटी कॉन्सिल ऑफ व्रोकला, यांनी माझ्या वडिलांच्या नावाने एका चौकाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे .. दसऱ्याला या पेक्षा मोठा आशिर्वाद दुसरा मिळाला नसता. व्रोकला येथील भारतीय समुदायासाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे. जय हिंद.'' असे अमिताभ यांनी लिहिले आहे.

अमिताभ यांनी ज्या चौकाला नाव देण्यात आलंय तेथील एक फोटोही पोस्ट केलाय. निळ्या, लाल आणि पिवळ्या रंगाच्या या बोर्डावर “स्क्वेअर हरिवंश राय बच्चन व्रोकला” लिहिलेले आहे.

जुलैमध्ये अमिताभ यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात रॉक्ला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली वाहताना “मधुशाला” या नामांकित कवितेच्या काही ओळी वाचून दाखवल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details