महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्टूडंट ऑफ द ईअर-२'च्या स्पेशल स्क्रिनिंगला या कलाकारांनी लावली हजेरी - tara sutariya

प्रदर्शनाआधी ठेवण्यात आलेल्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं

'स्टूडंट ऑफ द ईअर २'ची स्पेशल स्क्रिनिंग

By

Published : May 10, 2019, 10:57 AM IST

मुंबई- टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका असलेला 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. दरम्यान प्रदर्शनाआधी ठेवण्यात आलेल्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी वरूण धवन, सारा अली खान, सुरज पांचोली, कार्तिक आर्यन, अर्जून कपूर, अभिषेक बच्चन, मलायका अरोरा, खुशी कपूर, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेसह अनेक कलाकार स्क्रिनिंगला उपस्थित होते.

पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटातून तारा आणि अनन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तर टायगर इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details