मुंबई- टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज ३८ वा वाढदिवस आहे. याच खास दिवसाचे औचित्य साधत आज तामिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम.एस.धोनी' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले.
माहीच्या वाढदिवसानिमित्त या शहरात 'एम.एस.धोनी'च्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन - birthday special
हा चित्रपट पाहण्यासाठी माहीच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या टीमचे टी शर्ट घालून अनेक चाहते याठिकाणी आले होते. दरम्यान 'एम.एस.धोनी' चित्रपटाचं दिग्दर्शन निरज पांडे यांनी केलं आहे.
सुशांत सिंग राजपूत, दिशा पटानी आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'एम.एस.धोनी' चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. धोनीचा वाढदिवस खास पद्धीतीने साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी ३ वर्षांपूर्वी आलेल्या याच चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे चेन्नईच्या वेट्टरी सिनेमागृहात आयोजन केले.
हा चित्रपट पाहण्यासाठी माहीच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या टीमचे टी शर्ट घालून अनेक चाहते याठिकाणी आले होते. दरम्यान 'एम.एस.धोनी' चित्रपटाचं दिग्दर्शन निरज पांडे यांनी केलं आहे. १०४ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१६ कोटींचा गल्ला जमावला होता.