मुंबई- 'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे. १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा झाली असून आता यातील अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे.
अजयच्या 'भूज द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी - ajay devgan
१९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.
अजय देवगण या चित्रपटात स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. तर अजयच्या अपोझिट आता प्रणिता सुभाष या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. प्रणितानं याआधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाच्या माध्यमातून ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटात अजय आणि प्रणिताशिवाय संजय दत्त, राणा दग्गुबती, सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. अभिषेक दुधाइया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. १४ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.