मुंबई - अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सुर्यवंशी' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. २४ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
नेहमी शुक्रवारी चित्रपट रिलीज होत असतो. मात्र 'सुर्यवंशी' मंगळवारी संध्याकाळी रिली केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मल्टीप्लेक्सेस, रेस्टोरेंट्स आणि मॉल्स २४ तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'सुर्यवंशी'च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतलाय.