महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुरज पांचोलीच्या ‘सॅटेलाइट शंकर'च्या ट्रेलरची प्रेक्षकांत उत्कंठा - Satellite Shankar latest news

सुरज ‘सॅटेलाइट शंकर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुरजशिवाय मेघा आकाशची महत्त्वाची भूमिका असणार आहे. भूषण कुमार, मुरद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वरदे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

New poster of Satellite Shankar

By

Published : Oct 16, 2019, 8:35 PM IST


मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोली आता ‘सॅटेलाइट शंकर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २०१५ मध्ये आलेल्या हिरो चित्रपटानंतर आता तब्बल ४ वर्षांने सुरज बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


या चित्रपटात सुरज एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात सुरजशिवाय मेघा आकाशची महत्त्वाची भूमिका असणार आहे. भूषण कुमार, मुरद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वरदे या चित्रपटाची निर्मिती करत असून विशाल विजय कुमार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर इरफान कमल यांचे दिग्दर्शन आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details